खेड तिहेरी अपघात प्रकरणी रिक्षा टेम्पो चालकावर गुन्हा

खेड(प्रतिनिधी)
खेड दापोली मार्गावरील नाना नानी पार्क नजीक मालवाहू रिक्षा टेम्पो, रिक्षा व दुचाकी यांच्या मध्ये २५ एप्रिल रोजी झालेल्या तिहेरी अपघात प्रकरणी रिक्षा टेम्पो चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे
 कृष्णा सुरेश मेस्त्री वय ३६ वर्षे व्यवसाय चालक रा. कशेडी सुतारवाडी ता. खेड जि. रत्नागिरी. असे त्या गुन्हा दाखल झालेल्या मालवाहू  रिक्षा टेम्पो चालकाचे नाव आहे
चालक मेस्त्री हा त्याच्या ताब्यातील  मालवाडु रिक्षा टेम्पो के एम एच ०८ ए क्यु ७९३० हि घेवुन खेड ते दापोली जाणारे रोडने भरणे नाका ते चिंचघर अशी चालवित घेवुन जात असताना नानानाणी पार्क जवळ अपपातस्थळी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पिकअप गाडीला ओव्हरटेक करुन आपली डावी बाजु सोडुन रस्त्याचे मध्य दुभाजकाचे उजवे बाजुला जावुन समोरुन येणारे रिक्षा क्रमांक एम.एच ०८ ए क्यू ४९४८ ला समोरा समोर उजवे बाजुस ठोकरून अपघात केला  या अपघात रिक्षा चालक इर्षाद इसाक अडरेकर रिक्षातील प्रवाशी रिझवाना जोहर चिकटे, अल्फिया मुव्वीरकाझी दोन्ही रा खोंडा ता दापोली हे जखमी झाले होते