सवेणी मोहल्ला वयोवृध्द इसमावर केलेल्या हल्लाप्रकरणी संशयिताचा जामीन मंजूर

खेड (प्रतिनिधी) तालुक्यातील सवेणी मोहल्ला येथील सय्यदअली शेख हुसैन चिपळूणकर ( वय – ५४ ) यांच्यावर हल्ला करून त्यांना जखमी केल्याप्रकरणी संशयित असलेला त्यांचा सख्खा भाऊ शमसुद्दिन शेख हुसैन चिपळूणकर ( वय – ६५ ) यांची विधीतज्ज्ञ कु. पुनम जाधव यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य मानून येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी जामिनावर मुक्तता केली आहे.

२७ रोजी दुपारी १२ : ३० वाजता संशयित शमसुद्दीन चिपळूणकर यांनी आपल्या राहत्या घराच्या अंगणात फिर्यादी सय्यदअली चिपळूणकर यांना शिविगाळ करीत, त्यांच्या पाठीवर व पायावर धारदार शस्त्र वापरून वार केले, त्यामध्ये तक्रारदार सय्यदअली हे जखमी झाले, अशा प्रकारची फिर्याद सय्यदअली यांनी . २७ मे रोजी रात्री १० : ४३ वाजता दिली असता गुन्हा दाखल करण्यात आला होता

संशयित शमसुद्दिन याला . ३१ मे रोजी दुपारी १२ : वाजता अटक करून त्याला प्रथम वर्ग न्यायालय, खेड येथे हजर केले असता, त्याला न्यायालय कोठडी मंजुर करण्यात आली.

न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर याचदिवशी संशयित खेड येथील प्रथम वर्ग न्यायालय येथे जामीन अर्ज दाखल करण्यात आला. ऍड. कु.पुनम जाधव यांनी जामीन अर्जावर युक्तीवाद केला, ऍड . कु. जाधव यांचा युक्तीवाद ग्राहय धरून संशयित आरोपी शमसुद्दिन चिपळूणकर यांचा काही अटी व शर्तीवर जामीन अर्ज मंजुर करण्यात आला.