खासदार नारायण राणे यांना तालुक्यात सर्वच ठिकाणी चांगले मताधिक्य
लांजा( प्रतिनिधी) नुकत्याच पार पडलेल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे निवडणूकीत भाजपा पदाधिकारी यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावत ना. नारायण राणे यांना चांगले मताधिक्य मिळवून दिले. विशेषतः भाजपा युवा मोर्चा लोकसभा संयोजक संजय यादव, जिल्हा उपाध्यक्ष महेश खामकर तसेच जिल्हा सरचिटणीस संजय आयरे, तालुकाध्यक्ष चंद्रकांत मांडवकर यांनी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांना सोबत घेऊन, जोरदार प्रचार यंत्रणा राबवून लांजा शहर व तालुक्यात खासदार नारायण राणे यांच्या विजयात मोलाचा हातभार लावला.
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेची निवडणूक नुकतीच पार पडली .यामध्ये लांजा शहरासह भांबेड जिल्हा परिषद गटातून या निवडणुकीसाठी विशेष मेहनत घेण्यात आली. यामध्ये भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष महेश खामकर जिल्हा सरचिटणीस संजय आयरे, तालुका सरचिटणीस शैलेश खामकर यांनी भांबेड जिल्हा परिषद गटात पंचायत समिती गणातून २३०० मते देत आपले अमूल्य योगदान दिले. तर महेश खामकर तसेच भाजपा युवा मोर्चा लोकसभा संयोजक आणि नगरसेवक संजय यादव यांनी यांच्यासह सर्वच भाजपा पदाधिकाऱ्यांनी जोरदार प्रचार यंत्रणा राबविली.
खासदार नारायण राणे आणि माजी खासदार निलेश राणे यांचे कट्टर समर्थक असलेले महेश उर्फ मुन्ना खामकर तसेच नगरसेवक संजय यादव, तालका सरचिटणीस विराज हरमले यांनी तालुक्यात सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांसह जोरदार प्रचार यंत्रणा राबवली होती. याचाच परिपाक म्हणून तालुक्यात ज्या- ज्या ठिकाणी शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे प्राबल होते अशा अनेक ठिकाणी भाजपाला आणि पर्यायाने खासदार नारायण राणे यांना ठाकरे गटापेक्षा अधिक मताधिक्य मिळाले आहे. अनेक ठिकाणी ठाकरे गटाचे गड उध्वस्त करून भाजपाचा झेंडा डौलाने फडकला आहे.
या निवडणुकीत भाजपच्या सर्वच प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिंदे गटाला सोबत घेऊन जोरदार प्रचार यंत्रणा राबवत अनेक ठिकाणी खासदार नारायण राणे यांना मताधिक्य देण्यात हे पदाधिकारी यशस्वी ठरले आहेत. सर्वच ठिकाणी पक्षाला अभुतपुर्व असे यश मिळवून देण्यात महत्त्वाचे योगदान दिले आहे. महेश खामकर, संजय यादव व अन्य पदाधिकारी यांनी अनेक बुथवर ठाकरे गटाचे प्राबल्य मोडीत काढून भारतीय जनता पक्षाला दिलेल्या लीडने तालुक्यात पक्षाची ताकद निश्चितच वाढली असून आगामी विधानसभा तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीत अशाच प्रकारे पक्षाला यश मिळवून देण्याचा निर्धार जिल्हा उपाध्यक्ष महेश खामकर, नगरसेवक संजय यादव यांनी बोलून दाखवला.











