सालपे गावातील वॉर्ड नंबर तीन मधून 173 पैकी 90 मते भाजपाला
लांजा (प्रतिनिधी ) तालुक्यातील सालपे ग्रामपंचायत सदस्य संकेत घाग यांनी विकास कामांच्या जोरावर लोकसभा निवडणूकीत सालपे ग्रामपंचायत वॉर्ड नंबर तीन मधून 173 पैकी 90 मते भाजपाला देत
ठाकरे गटाला धक्का दिला आहे.
दरम्यान, नरेंद्र मोदी यांचे विकासाची धोरण आणि राणे साहेबांचे नेतृत्व याच्या जोरावर लवकरच आम्ही सालपे गाव १००% भाजपमय करणार असल्याचा विश्वास संकेत घाग यांनी बोलून दाखविला. तर शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला गाव आता संकेत घाग यांच्या नेतृत्वात विकासासाठी भाजपला मतदान करतोय हे देखील अधोरेखित झाले आहे.
याबाबत बोलताना ग्रामपंचायत सदस्य संकेत घाग यांनी सांगितले की, गेल्या अनेक वर्षांपासून सालपे गाव हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता. गावातून दत्ता कदम पंधरा वर्षे पंचायत समिती सदस्य, दहा वर्ष जिल्हा परिषद सदस्य,, पंचायत समिती सभापती तसेच जिल्हा परिषद स्थायी समिती अध्यक्ष आणि जिल्हा परिषद बांधकाम समिती अध्यक्ष तर तसेच श्रीकांत कांबळे यांनी पंचायत समिती उपसभापती होते. सालपे गावच्या नागरिकांनी दोन व्यक्तींना निवडून दिले. परंतु गावात विकासाच्या नावाने बोंब असल्यामुळे गावातील मतदारांनी आता विकासाचे दृष्टीने संकेत घाग यांच्या नेतृत्वात भाजपला मतदान केले.
अशा प्रकारे ग्रामपंचायत सदस्य संकेत घाग यांनी दमदार कामगिरी करताना शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात जोरदार धक्का दिला आहे.











