आचरा–अर्जुन बापर्डेकर : धी आचरा पीपल्स असोसिएशन मुंबई संचलित न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्याल आचराच्या पटांगणावर दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रशालाचे मुख्याध्यापक गोपाळ परब यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्तावित केले .योग प्रशिक्षक अशोक कांबळे यांनी जीवनात योगाचे महत्त्व विद्यार्थ्यांना स्पष्ट करून सांगितले .
यावेळी लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी शाखा आचराचे शाखा व्यवस्थापक मोर्वेकर आणि त्यांचे सहकारी यांनी योगा डे मध्ये सहभाग घेतला यावेळी त्यांनी मुलांना लाॅंग बुक आणि योगा पुस्तिका देऊन त्यांचे कौतुक केले .या कार्यक्रमा मध्ये प्रशालेची पाचवी ते बारावीचे सर्व विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आधी सहभागी झाले होते.











