कोकण पदवीधरच्या निवडणुकीत ९ वाजेपर्यंत ७.३० %मतदान

रत्नागिरी : कोकण पदवीधर मतदार संघासाठी सुरु झालेल्या मतदानामध्ये सकाळी ९ वाजेपर्यंत ७.३० टक्के मतदान झाले आहे.

भाजप महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार निरंजन डावखरे आणि काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश किर यांच्या प्रमुख लढत आहे. सकाळी ९ वाजेपर्यंत मतदार संघात समाविष्ट पालघरमधे ५.८०%, ठाणे जिल्ह्यात ८.४२ %, रायगड जिल्ह्यात ७%, रत्नागिरीमध्ये ५.०६% तर सिंधदुर्ग जिल्ह्यात ७.२५ % मतदान झाले आहे.

 

तर याच निवडणूक प्रक्रियेतीलमुंबई पदवीधर मतदार संघासाठी ९ वाजेपर्यंत १०.४६% तर मुंबई शिक्षक मतदार संघासाठी सकाळी ९ वाजेपर्यंत ७.५०% मतदान पार पडले आहे.