लांजा (प्रतिनिधी) तालुक्यातील आसगे येथील नवयुग सेवा मंडळ मांडवकरवाडी च्यावतीने कला, क्रीडा, सेवा , संस्कार अभियानाचा नुकताच शुभारंभ करण्यात आला. या अभियानांतर्गत दर रविवारी
विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
या उद्घाटन कार्यक्रमाला आसगे पंचक्रोशी संस्थेचे उपाध्यक्ष पांडुरंग चौगुले, सचिव राजाराम चव्हाण, नवयुग सेवा मंडळ ग्रामीण शाखेचे अध्यक्ष किशोर मांडवकर, माजी शिक्षक प्रभाकर सनगरे आदी मान्यवर उपस्थित होते.
दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुणे मंडळाचे कार्यवाह सुरेश मांडवकर यांनी केले. यावेळी पांडुरंग चौगुले, प्रभाकर सनगरे, प्रकाश हर्चेकर, क्रीडा शिक्षक सुशील वासुरकर आप्पा साळवी यांनी मार्गदर्शन केले. दहावी, बारावी तसेच उच्च शिक्षणात यशस्वी झालेल्या स्वरांजली मांडवकर, सिमरन मांडवकर, सिद्धेश मांडवकर, विनायक दाभोळकर, सौरभ मांडवकर, सृष्टी मांडवकर, शिवानी धावडे यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी सरपंच विश्वास मांडवकर व दिलीप दाभोळकर यांनी केले.











