काही लोकं डोकं नसल्यासारखे बोलतात!

 

भाजपा नेते निलेश राणे यांचा आ. वैभव नाईक व उबाठा गटाला टोला 

मालवण | प्रतिनिधी : ‘काही लोकं डोकं नसल्यासारखे बोलतात.’ असे सांगत भाजपा नेते निलेश राणे यांनी आ. वैभव नाईक व उबाठा गटाला जोरदार टोला लगावला आहे.

 

 

निलेश राणे म्हणाले, मालवण मध्ये कांदळगावत एक शाळा स्वखर्चातून दुरुस्ती करण्यासाठी घेतली. त्यात पण उबाठा गटाच्या आमदारांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना वाईट वाटलं. त्यांचं म्हणणं आहे की शाळा पडायच्या अगोदर आपण निधीची तरतूद का केली नाही.

 

काही लोकं डोकं नसल्यासारखे बोलतात, मागचे दहा वर्ष आणि त्यातले साडेसात वर्ष आमदार वैभव नाईक सत्तेत होते, त्यातले उद्धव ठाकरे अडीच वर्ष मुख्यमंत्री होते मग काम का झालं नाही?

 

इतक्या लहान मनाचे माणसाने राहू नये, लहान विद्यार्थ्यांना आज बसायला जागा नाही, तो खर्च कुठूनही आला तो येऊ दे पण तो विद्यार्थ्यांसाठी आहे यात समाधान वाटायला हवं होतं. असे निलेश राणे यांनी म्हटले आहे.