मोठी बातमी!  विधान परिषदेसाठी भाजपची पाच जणांची यादी जाहीर

 

 

 

 

पंकजा मुंडेंना मिळाली पुन्हा संधी

मुंबई : विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या ११ जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची उद्या २ जुलै शेवटची तारीख आहे. त्यामुळे अर्ज भरण्यासाठी अवघे काही तास उरले आहेत. मात्र, राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडीकडून उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली नव्हती. अशातच आता महायुतीमधील भाजपच्या पाच उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.

 

यामध्ये बीड लोकसभेच्या निवडणुकीत अवघ्या सहा हजार मतांनी पराभव झालेल्या पंकजा मुंडे यांचे विधान परिषदेच्या माध्यमातून पुनर्वसन करण्यात आले आहे भाजपने विधान परिषदेसाठी पंकजा मुंडे यांना संधी दिली आहे. दरम्यान विधान परिषदेसाठी महाराष्ट्र भाजपने पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाकडे १० नावे पाठवली होती.

 

त्यातील पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, परिणय फुके, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत या पाच जणांच्या नावांवर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. येत्या १२ जुलै रोजी विधान परिषदेसाठी मतदान होणार असून त्याचदिवशी निकाल जाहीर होणार आहे.