कृषि अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयात 25 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

 

 

दापोली l प्रतिनिधी: कृषि अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयाचा नुकताच २५ वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. या महाविद्यालयाची स्थापना 3 जुलै 1999 करण्यात आली होती. या स्थापनेत कै. डॉ. अशोक पोवार यांच्यासह अनेक आजी-माजी अधिकारी कर्मचारी यांचे मोलाचे योगदान लाभले आहे.

 

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणुन डॉ. व्हि.एम.मायंदे- माजी कुलगुरू, पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला, डॉ.सईद इस्माईल-संचालक में.सिफा सांप्रा प्रा.लि. मुंबई, डॉ. संजय भावे-,कुलगुरू, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली, डॉ. सचिन नांदगुडे- सहयोगी अधिष्ठाता-मालेगांव, डॉ. प्रशांत शहारे-सहयोगी अधिष्ठाता, कृषि अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, दापोली,डॉ. मकरंद जोशी-सहयोगी अधिष्ठाता, कृषि महाविद्यालय दापोली, सौ. अपर्णा पित्रे-नियंत्रण,डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली, विभागप्रमुख-डॉ. बी.एल.आयरे, डॉ. अतुल मोहोड, डॉ.संदिपकुमार जैन, डॉ. अभिमान सावंत, सर्व प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी आदी मान्यवर उपस्थित होते.

 

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. मायंदे यांनी बोलताना सांगितले की, कृषी अभियंता हा कृषि शिक्षण व कृषि यांत्रिकीकरण यासाठी अत्यंत आवश्यक आहे. कृषि अभियंता विविध क्षेत्रामध्ये काम करुन उत्पादकता वाढवु शकतो. सध्यस्थितीमध्ये वातावरण बदलाला अनुकुल शेती पद्धती विकसित करणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी कृषि अभियंताच योग्य मार्ग काढु शकत़ो.

 

सिफा कंपनीचे संचालक डॉ. सईद इस्माईल यांनी कृषि अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयातील परदेशातुन प्रशिक्षण घेऊन आलेल्या व विविध प्रायव्हेट कंपनीमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. त्यांनी प्रायव्हेट क्षेत्रामध्ये कृषि अभियंत्यासाठी भविष्यातील विविध संधी या विषयी मार्गदर्शन केले.

 

या कार्यक्रमाला विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे यांनी

कृषि अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या २५ व्या वर्धापनदिन निमित्त शुभेच्छा दिल्या तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना नोकरी मिळविणारे पेक्षा नोकरी देणारे बनण्याचा प्रयत्न करावे. विविध क्षेत्रामध्ये कृषि अभियंतांची गरज लक्षात घेऊन त्यानुसार विद्यार्थांनी आपल्या कलागुणांचा विकास करावा असे बोलताना सांगितले.

 

२५ व्या वर्धापनदिन निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या महाविद्यालयातील विविध कंपन्यांमध्ये प्लेसमेंट तसेच गेट स्कोर करणाऱ्या ४२ विद्यार्थांचा सन्मान करण्यात आला तर २०२४-२०२५ ची सर्वात उत्कृष्ट विद्यार्थीनी म्हणुन पल्लवी पाटिल हिचा विशेष सन्मान करण्यात आला. यामध्ये टेक्निकल सेशन, सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाने सांगता करण्यात आली.

 

या कार्यक्रमाला माजी विद्यार्थी संदिप तांबे, डॉ. ऋतुजा पालटे,संजय इदाते, श्वेतांबरी पालकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. पुनम चव्हाण यांनी केले.

 

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. निलेश शिरसाट, श्री. संदिप थोरात, गणेश कदम, , सौरव कदम,अक्षता मेंगाळ, कल्याणी पाटिल, जान्हवी दुपटे, साक्षी देसाई, सत्यजित मोहिते यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य लाभले.