तात्काळ स्थानिक युवकांनी श्रमदानातून साफ सफाई
तळकट सरपंच याचा पुढाकार
दोडामार्ग : सुहास देसाई
तालुक्यातील तळकट ते बांदा रस्त्यावर पडलेले काजूचे झाड तळकट येथील युवकांनी श्रमदानातून बाजूला केले. व रस्ता वाहतूक सुरळीत केली आहे सतत कोसळणाऱ्या व दोन-तीन दिवस सुरू असलेल्या जोरदार वाऱ्या पावसामुळे ठिकठिकाणी झाडे पडून नुकसान झाले आहे काहींच्या घरावर या परीसरात झाडे पडून तर काही ठिकाणी रस्त्यावर झाडे पडून वाहतूक कोळंबली आहे. अशाच प्रकारे तळकट बांदा रोडवर तळकट गोठणवाडी या ठिकाणी आज सकाळी काजूचे मोठे झाड पडून वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. याची माहिती तळकट सरपंच सुरेंद्र सावंत भोसले यांना मिळतात, त्यांनी आपल्या मित्र परिवारासह हे झाड बाजूला केले व भातुक सुरळीत चालू राहण्यास मदत केली. आज सोमवारचा दिवस असल्यामुळे बांधा आठवड्या बाजारासाठी जाणाऱ्यांची मोठी दोन्ही बाजूने रांग लागली होती. हे झाड लगेच बाजूला केल्यामुळे तळकट सरपंच सुरेंद्र सावंत भोसले, त्यांचे सहकारी नारायण राऊळ, रजत देसाई, विकास सावंत, बंड्या राऊळ, साहिल नांगरे, प्रज्योत देसाई, चंद्रहास राऊळ, बाबल गवस, इत्यादींचे अभिनंदन होत आहे.
दरम्यान तळकट बांदा रोडवर तळकट फॉरेस्ट विभागाची झाडे रस्त्यावर कधीही पडण्याच्या स्थितीत आहे. ही झाडे वाहतुकीस अडथळे होऊ शकतो. तसेच वारंवार अपघात ही होण्याची शक्यता आहे त्यामुळे ही धोकादायक झाडे वन विभागाने तात्काळ तोडून घ्यावी अशी मागणी परिसरातून होत आहे











