पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या कल्पक नेतृत्वामुळे जिल्हा विकासाची छाप पुन्हा दिसेल!
सिंधुनगरी बाळ खडपकर
सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीचा सभेचे उद्या मंगळवारी सिंधुनगरी येथे जिल्हा नियोजन सभागृहात होत आहे. यावर्षी २५० कोटी खर्चाचा आराखडा असून त्यातील ८५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. विधानसभा निवडणूक आचारसंहिता तोंडावर आली असून राज्याच्या मंत्रिमंडळ कार्यकाळातील ही शेवटची सभा असेल, अशी शक्यता आहे. या सभेत जिल्ह्याच्या विकासाबाबत अनेक निर्णय होतील. पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचा जिल्ह्यातील विकास कामातील धडाका यापूर्वी दिसला असून या सभेनंतर पुन्हा दिसेल.
जिल्ह्यातील अनेक भागातील रस्ते, बस आणि रेल्वे स्थानके विश्राम गृहे, रेल्वे स्थानक परिसरातील रस्ते अशा अनेक कामांमुळे जिल्ह्याचा विकास हालता राहिला आहे. आरारखाड्यातील विकास निधी लोकसंख्येच्या प्रमाणात आपल्या जिल्ह्याला मिळत असतो, मात्र अधिकचा निधी कसा मिळवावा हे यापूर्वी भाजप नेते खासदार नारायण राणे यांनी दाखवून दिले होते, आता ही भाजपच्या सत्तेत पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी जिल्ह्यातील अनेक विकास कामांना अधिकचा निधी मिळून दिला आहे. व चांगली कामे या जिल्ह्यात झाली आहेत.
आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर असून मागील वर्षातील विकास निधीच्या खर्चाचा आढावा या वर्षातील कामांचे नियोजन व उपलब्ध निधी चे वितरण या सभेत होणार आहे. आमदार खासदार यासह विशेष निमंत्रित सदस्य यांच्या उपस्थितीत ही निवडणूक काळापूर्वीची जिल्हा नियोजन समितीची सभा महत्त्वाची असून जिल्ह्यातील विविध विकास कामावर या सभेत चर्चा होईल. जिल्ह्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे काम व त्यासाठी निधी भाजपच्या सत्तेत मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाला आहे. या शासकीय महाविद्यालयात गती देण्याचे काम झाले आहे. जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या पूर परिस्थितीचा व झालेल्या मदत कार्याचा आढावा या सभेत घेतला जाईल. जिल्ह्यातून गेलेल्या महामार्गाच्या निर्मितीनंतर काही भागात पाणी अडले जात असल्यामुळे व त्यामुळे नागरिकांचे नुकसान होत असल्यामुळे या सभेत त्याची चर्चा होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात समाधानकारक पाऊस असून भात पिकाला पोषक ठरल्याचे सांगण्यात येते. या सर्व प्रश्नांबरोबरच पर्यटन जिल्हा त्यामधील सुख सोयी काही रेंगाळलेली कामे याबाबत या सभेत महत्त्वपूर्ण चर्चा होईल अशी अपेक्षा आहे











