गावखडी । वार्ताहर : मेर्वी जि.प.प्रा.शाळा मेर्वी गुरववाडी येथे मुलांनी आषाढी एकादशी निमित्त श्री नवलादेवी मंदिर येथे भेट देऊन श्री विठ्ठल-रखमाईचा वेश, वारकरी वेश परिधान करून दिंडी काढण्यात आली.
सर्व मुलानी हरिमनामाचा गजर केला त्यामुळे करित परिसर हरिमय झाला. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका करगुटकर, संतोष मुडे, अंगणवाडी सेविका सत्यश्री खडे, कुरतडकर, यांची उपस्थिती लाभली होती
तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिलीप गुरव यानी उपस्थितांचे स्वागत व आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता झाली .












