खेड(प्रतिनिधी) मुंबई गोवा महामार्गावरील भरणे नाका येथील उडान पुलाखाली रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांना चुकवता एका टेम्पोला सोमवारी सकाळी अपघात झाला. सुदेवाने कोणीही जखमी झाले नाही. रस्त्यावरचे खड्डे चुकवितानां हा अपघात झाला आहे. भरणे खेड मार्गांवर खड्ड्याचें साम्राज्य पसरले आहे. वाहन चालकांना नाहक यांचा त्रास सहन करावा लागत आहे.
रस्त्यावरचे खड्डे चुकवितानां हा अपघात झाला . भरणे खेड मार्गांवर खड्ड्याचें साम्राज्य पसरले आहे. वाहन चालकांना नाहक यांचा त्रास सहन करावा लागत आहे. सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, यांनी यां संदर्भात जास्त लक्ष देऊन संबंधित हायवे च्या ठेकेदाराला, व प्रशासनाला याचा जाब विचारण्याची आवश्यकता असल्याचे अनेकानी मत व्यक्त केले. वाहन चालवीत असताना खड्डे चुकवण्याच्या नादात लोकांचा नाहक बळी गेल्यावर यांना जाग येणार आहे का? असे विविध सवाल उपस्थित करण्यात येत आहेत.












