आचरा | अर्जुन बापर्डेकर : त्रिंबक परिसर व लगतच्या परिसरात सोमवारी सायंकाळी झालेल्या चक्रीवादळाचा फटका त्रिंबक येथील गावडे कुटूंबाला बसला. यात त्यांचे घराचे छप्पर उडून मोठे नुकसान झाले होते. याबाबत माहिती मिळताच भाजप नेते माजी खासदार निलेश राणे यांनी भाजप तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांच्या माध्यमातून गावडे कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत केली आहे.
मंगळवारी त्रिंबक सरपंच किशोर त्रिंबककर याच्या हस्ते तारामती गावडे यांना सुपूर्द करण्यात आली. यावेळी भाजप मालवण तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर,माजी उपसभापती राजू परुळेकर, पळसंब सरपंच महेश वरक, दिपक सुर्वे, संतोष गावकर, त्रिंबकउपसरपंच आशिष बागवे, सदस्य सौ. सपना तेली, नेहा,सुचिता, संतोषी,रोहित, पो. पाटील सकपाळ ग्रामसेवक कामतेकर, ग्रामस्थ बाळा साटम, संतोष घाडीगांवकर, शेखर सुतार तसेच इतर ग्रामस्थ आदी उपस्थित होते.












