गुहागर | प्रतिनिधी : गुहागर तालुक्यातील तळवली भडकंबावाडी मौजे मुंढर – शिरबारवाडी व चाळकेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळवली न. २ या शाळेचा अमृत महोत्सव सोहळा मंगळवार दि. २५ एप्रिल २०२३ रोजी आयोजित करण्यात आला आहे.या अमृतमहोत्सवी सोहळ्या निमित्त विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या अमृतमहोत्सवी सोहळ्यानिमित्त मंगळवार दि.२५ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ८ वा.शोभायात्रा, सकाळी ९ वा. अल्पोपहार, सकाळी १० वा.माजी विद्यार्थी मेळावा व मान्यवरांचा सत्कार दुपारी १ वा.स्नेहभोजन, दुपारी ३ वा. रक्तदान शिबीर, सायं.५ वा- फनी गेम्स, साय.६ वा हळदीकुंकू, रात्री ९ वा. जि.प. प्राथमिक शाळा तळवली न.२ चे आजी माजी विद्यार्थी यांचे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून गुहागरच्या तहसिलदार प्रतिभा वराळे, गटविकास अधिकारी प्रशांत राऊत, गटशिक्षणाधिकारी लीना भागवत, विस्तार अधिकारी रायचंद्र गळवे, केंद्रीय प्रमुख सुभाष पवार, तळवली सरपंच मयुरी शिगवण, मुंढर कातकीरी सरपंच सुशील आग्रे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.तरी या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन अमृत महोत्सव कमिटी अध्यक्ष प्रमोद गांधी, उपाध्यक्ष प्रभाकर कांबळे, सचिव अमोल जड्याळ, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शरद कळंबाटे, मुख्याध्यापिका सुजाता मोदी, जि.प. शाळा तळवली न. २ व अंगणवाडी चे सर्व शिक्षकवृंद यांनी केले आहे.












