जांभवडे न्यू शिवाजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये शिक्षण सप्ताह संपन्न

कुडाळ तालुक्यातील न्यू शिवाजी हायस्कूल व कॉमर्स,सायन्स,, एम सी व्ही सी विभाग जांभवडे याप्रशालेत 22 जुलै ते 28 जुलै शिक्षण सप्ताह विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.या शिक्षण सप्ताहानिमित्त शैक्षणिक साहित्य निर्मिति ., पायाभूत साक्षरता व संख्या अभ्यास, मैदानी व पारंपारिक खेळ ,,लोककला,,सांस्कृतिक कार्यक्रम,,कौशल्य दिवस,, इको क्लब स्थापना, शिक्षण संस्थेचे मा. चेअरमन श्री. सुभाष मडव ,,यांच्या हस्ते वृक्षारोपण व सातव्या दिवशी प्रशालेला मोलाचे सहकार्य देणाऱ्या सेवाभावी व्यक्तींचा तसेच संस्था पदाधिकाऱ्यांचा सत्कार प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. अनिल कासलेसर यांच्या हस्ते वृक्ष व श्रीफळ देवून करण्यात आला,,नवभारत शिक्षण व विद्यांजली कार्यक्रमाचा जागर,,,समुदाय दिवस म्हणून प्रशालेत सहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.

 

शिक्षण सप्ताहासाठी विदयार्थी पालक यांचा प्रतिसाद चांगला होता ,, राबविलेल्या उपक्रमाबाबत प्रत्येक शिक्षकांनी मूल्यमापन व आपले अनुभव कथन केले,,,संस्था चेअरमन सुभाष मडव यांनी,,,आज स्पर्धा युगात कोणतंही ज्ञान शालेय वेळापत्रकात,,, पुस्तकात बंदिस्त नाही,,, परीक्षेतील यशापेक्षा जीवनातील यश महत्वाचे,,यासाठी नवीन शैक्षणिक धोरणात विविध कौशल्य विद्यार्थ्यांनी आत्मसात केली पाहिजेत असे सांगितले,,या प्रसंगी व्यापीठावर व्हाईस चेअरमन,,बा. शि.परब गुरुजी .संस्था सदस्य श्री दिनकर अरवारी,श्री. लवू घाडी, श्री.मनोहर गावकर, श्री. तेरसे.श्री संजय चव्हाण,,माजी मुख्याध्यापक एस एस सावंत सर, सत्कार मूर्ती श्री. एम. व्हीं. काजरेकर सर,,श्री गुणवंत सावंत,, ,उपस्थित होते,, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, श्री. यू एम सावंत सर यांनी केले