खेड(प्रतिनिधी) खेड तालुक्यातील खोपी गावचे पोलीस पाटील प्रशांत भोसले यांना कायमस्वरूपी बडतर्फ करण्याच्या मागणी साठी खोपी तांबड वाडी येथील ग्रामस्थ पुंन्हा
स्वातंत्र्य दिनी उपोषण करणार असल्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना सादर केले आहे
पोलीस पाटील भोसले हे नियमबाह्य वागून अवघ्या गावात दहशत माजवत असल्याचा आरोप करून त्यांना तात्काळ बडतर्फ करण्याच्या मागणी साठी १५ फेब्रुवारी २०२४ रोजी येथील तहसील कार्यालय च्या आवारात आमरण उपोषण छेडले होते त्यावेळी
पोलीस पाटील प्रशांत भोसले यांना तात्पुरत्या स्वरुपात निलंबित केले होते मात्र बडतर्फ केले नव्हते याबाबत वारंवार निवेदने सादर करून देखील कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही
त्या मूळे पोलीस पाटील भोसले हे गावामध्ये त्याच्या नावाचा मोठा फलक लावुन मीच पोलीस पाटील आहे असे सर्वांना भासवून दहशत निर्माण करीत असल्याचे भासवत आहे त्या मूळे प्रशासना ने वेळीच लक्ष देऊन कार्यवाही केली असती तर पुन्हा उपोषण करण्याची वेळ आली नसती त्या मुळे या अनागोदी कारभाराबाबत उपोषण छेडले जाणार आहे या निवेदनावर गावातील ३० हुन अधिक ग्रामस्थां च्या सह्या आहेत










