भरणेत जुगार अड्ड्यावर धाड एकावर गुन्हा

 

खेड(प्रतिनिधी)

भरणे ग्राममपंचायतीच्या उजव्या बाजुस मोकळ्या जागेत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर येथील पोलिसांनी धाड टाकून २५४० रुपयांचा मुद्दे माल जप्त केला या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई १० ऑगस्ट रोजी करण्यात आली

अशोक विश्राम यादव वय ४५ वर्ष ,भरणे ता-खेड असे त्या गुन्हा दाखल झालेल्या चे नाव आहे
यातील यादव हा दैनीक पेपर मध्ये प्रसिध्द होणा-या शुभ अंकावर पैसे लावुन मटका जुगाराचा खेळ खेळवित असताना मिळुन आला