खेड मनसे तालुकाध्यक्षपदी निलेश बामणे

निलेश बामणे यांना तालुकाध्यक्षपदाच्या नियुक्तीचे पत्र देताना मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर

 

खेड | प्रतिनिधी

खेड मनसेच्या तालुकाध्यक्षपदी निलेश बामणे यांची निवड करण्यात आली आहे. यापूर्वी ते तालुका सचिवपदावर कार्यरत होते. मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी तसे नियुक्तीपत्र दिले आहे.

मनसेच्या तालुका सचिवपदाची धुरा सांभाळणारे निलेश बामणे वेरळ ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत. त्यांनी पक्षवाढीसाठी दिलेल्या योगदानाची दख़ल घेवून त्यांच्याकडे तालुकाध्यक्षपदाची धुरा देण्यात आली आहे.

या निवडीबद्दल मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष सचिन गायकवाड, जिल्हा सचिव संतोष नलावडे, शहराध्यक्ष ऋषीकेश कानडे, प्रवक्ते संभाजी देवकाते, नंदू साळवी, शैलेश धारिया, प्रसाद शेट्ये, केतन आंब्रे, जयेश गुहागरकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.