सावंतवाडी । प्रतिनिधी : राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषद, संस्कृती मंत्रालय भारत सरकार, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे, नेहरू युवा केंद्र वरळी मुंबई, राज्य विज्ञान शिक्षण संस्था (प्रादेशिक विद्या प्राधिकरण) रवीनगर नागपूर विभागीय शिक्षण उपसंचालक कोल्हापूर विभाग कोल्हापूर , शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सिंधुदुर्ग व जिल्हा विज्ञान मंडळ सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव २०२४ जिल्हास्तरीय स्पर्धा सावंतवाडी तील बॅरिस्टर नाथ पै सभागृह, नगरपरिषद सावंतवाडी येथे बुधवार दिनांक २१ ऑगस्ट रोजी १० वाजता संपन्न होणार आहे.
जिल्ह्यातील आठ तालुक्यातील प्रथम क्रमांक प्राप्त शाळांचे आठ संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहे. तरी जिल्ह्यातील विज्ञान प्रेमी विद्यार्थी, शिक्षक व पालक यांनी या नाट्योत्सवाचा आनंद घ्यावा, अशी सौ. शिंपी मॅडम, माध्यमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग व जिल्हा विज्ञान मंडळ, सिंधुदुर्ग यांच्या वतीने करण्यात आली आहे.











