वडीलांच्या पाचव्या स्मृती दिनी शाळेतील मुलांना केले शैक्षणिक साहित्याचे वाटप

 

बामणोली येथील सुरेश चांदिवडे आणि परिवाराने जपली सामाजिक बांधिलकी

चिपळूण (वार्ताहर) : तालुक्यातील किजबिलेवाडी येथील हभप स्व.मारुती बाबू चांदिवडे यांचा पाचवा स्मृतिदिन सोहळा त्यांच्या निवासस्थानी बुधवार २१ रोजी पार पडला. यावेळी त्यांचे चिरंजीव सुरेश चांदिवडे आणि परिवाराने या दिनाचे उचित्य साधून जिल्हा परिषद शाळा मराठी बामणोली नंबर एक या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करत एक आदर्श सामाजिक सेवेचा वसा सर्वांसमोर ठेवला आहे.

 

हभप स्व.मारुती बाबू चांदिवदे आणि हभप स्व.रामचंद्र बाबू चांदिवडे हे वारकरी संप्रदायातील दोन बंधू होते. त्याचबरोबर त्यांची तीन बंधू सुद्धा मयत झालेले आहेत. यापैकी हभप स्व. मारुती चांदिवडे यांचा पाचवा स्मृतिदिन त्यांच्या निवासस्थानी चांदिवडे परिवाराने साजरा केला. सकाळी विधिवत श्राद्ध पूजन करण्यात आले. त्यानंतर दुपारी दोन वाजता जिल्हा परिषद शाळा मराठी बामणोली नंबर एक या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यामध्ये मुलांसाठी टाय, कंबरेचा पट्टा आणि पाण्याची बॉटल असे साहित्य दिले. शिक्षक वर्ग आणि शाळेला सुद्धा भेटवस्तू दिल्या. त्यानंतर संध्याकाळी सातारा येथील प्रसिद्ध कीर्तनकार शंकर माथाने यांचं कीर्तन पार पडले. या कीर्तनाला सुद्धा पंचक्रोशीतील भाविकांनी हजेरी लावली होती. सुरेश चांडिवडे , प्रकाश चंदिवदे आणि परिवाराने या कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन करत एक आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे. स्मृतिदिन साजरा करताना या सोहळ्याचे औचीत्य साधन शाळेतील मुलांना दिलेले शैक्षणिक साहित्य खऱ्या अर्थाने हभप मारुती चांदिवडे यांच्या जीवन कार्य यातील सेवेचा हा एक पैलू त्यांच्या कुटुंबीयांनी जपला आहे. सर्वांनीच या उपक्रमाचे कौतुक केले.

 

 

त्यांच्या संदर्भात सरपंच सुदेश गमरे, पत्रकार भाई कुळे आणि सौ. विठा बाईत यांनी आपले मनोगतम व्यक्त करत त्यांच्या कार्याचा सगळ्यांना परिचय करून दिला.

या कार्यक्रमाला बामनोलीचे सरपंच सुदेश गमरे, मुंबई स्थित उद्योजक आणि नवजवान मित्र मंडळाचे पदाधिकारी अशोक वनगे, पत्रकार भाई कुळे, माजी सरपंच दत्ताराम फावरे, तुकाराम वणे, रवींद्र तांबे, महादेव पवार, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. प्राजक्ता सुर्वे, सौ सोनाली सोमण, सौ. विशाखा गमरे उपस्थित होत्या. त्याचबरोबर गावातील ग्रामस्थ या कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास किसबिले यांनी केले.