खेड (प्रतिनिधी) मोरवंडे बोरज येथील ज्ञानदीप इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये (सीबीएसई) संस्कृत दिवस उत्साहात साजरा, करण्यात आला. प्राचार्य भरत मोरे व ज्ञानदीप औषधनिर्माणशास्त्रचे प्राचार्य डॉ. सुजित नगरे यांनी सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन केले.
इयत्ता ७वीतील सई जाधव, वेदा गायकर, मधुरा राजमाने यांनी मनोगते व्यक्त केली. आदिती मालकर व सार्थक बेंडल यांनी संस्कृत श्लोक पठण व अथर्व दिवेकर याने संस्कृत गोष्ट सांगितली. प्राचार्य भरत मोरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन इयत्ता ७वीतील पूर्वी चाळके हिने केले, तर करण दिगंबरे यांनी आभार मानले.










