आंबये स्कूलमधील पाच विद्यार्थ्यांना सायकल वाटप

 

खेड (प्रतिनिधी) तालुक्यातील आंबये येथील सह्याद्री शिक्षण संस्था संचलित न्यू इंग्लिश स्कूलमधील ५ विद्यार्थ्यांना दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून सायकलींचे वाटप करण्यात आले.

शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे युवक तालुकाध्यक्ष सुरज जोगळे, नागपूरमधील गायक हेमंत हर्ले, माजी विद्यार्थी अजित सकपाळ, समाजसेवक महादेव सकपाळ, स्कूल कमिटी चेअरमन गजानन सकपाळ यांनी स्वखर्चातून प्रत्येकी एक सायकल ५ विद्यार्थ्यांना दिली. याप्रसंगी मुख्याध्यापक पोद्दारे, माजी विद्यार्थी सचिन सकपाळ, मिलिंद सकपाळ आदी उपस्थित होते.