करबुडे येथे विवाहितेने घराशेजारील विहिरीत उडी घेत केली आत्महत्या

 

 

रत्नागिरी ः प्रतिनिधी :तालुक्यातील करबुडे येथील विवाहितेने अज्ञात कारणातून घराशेजारील विहितरी उडी घेत आत्महत्या केली. ही घटना बुधवार 28 ऑगस्ट रोजी सकाळी 4 वा.सुमारास घडली.

दर्शना दिनेश शितप (38,रा.करबुडे,रत्नागिरी) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. बुधवारी सकाळी 7 वा. सुमारास तिच्या घरातील नातेवाईकांना दर्शना घरात कोठेही दिसून आली नाही. त्यामुळे त्यांनी तिचा आजुबाजुला शोध घेण्यास सुरुवात केली. तेव्हा घराशेजारील विहिरीत दर्शना बुडालेल्या अवस्थेत दिसून आली. याबाबत ग्रामीण पोलिसांना माहिती देताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करुन उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात पाठवला. याबाबत ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्किम मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.