खेडमध्ये पर्यावरण पूरक गणेशोत्सव स्पर्धा

लायन्स क्लब व पत्रकार संघाचा उपक्रम: सार्वजनिक व घरगुती गणेशोत्सव

खेड (प्रतिनिधी) येथील लायन्स क्लब ऑफ खेड सिटी व खेड तालुका पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने यावर्षी पर्यावरण पूरक गणेशोत्सव स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे.

या स्पर्धेत सार्वजनिक व घरगुती गणेशोत्सव साजरा करणाऱ्या गणेशभक्तांनी आपली नांवे पत्रकार अनुज जोशी, दैनिक पुढारी मोबाईल फोन नंबर. ८४५९८२२१७२ यांचेकडे शुक्रवार ६ सप्टेंबर २०२४ पर्यंत नाव नोंदणी करून सहभागी घ्यावा. आणि स्पर्धा यशस्वी करण्यास सहकार्य करावे. असे आवाहन खेड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राजु चव्हाण व लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे अध्यक्ष सुरेश चिकणे यांनी केले आहे.

खेड तालुका पत्रकार संघ व लायन्स क्लब ऑफ खेड सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण पूरक गणेशोत्सव स्पर्धा यावर्षी खेड मध्ये आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेत खेड शहर व परिसरातील सार्वजनिक गणेश मंडळांना थेट सहभागी करू घेतले जाणार आहे. तर घरगुती गणेशोत्सव साजरा करणाऱ्या भाविकांनी गुगल फॉर्म भरून स्पर्धेत सहभाग घेता येईल.

स्पर्धेचे परीक्षण उत्सव काळात दिलेला सामाजिक संदेश, नावीन्यपूर्ण उपक्रम, प्रदूषण विरहित उत्सव, पर्यावरण पूरक सजावट आदी मुद्द्याच्या आधारे करण्यात येईल. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातून तीन विजेते निवडण्यात येणार आहेत . त्यांना अनुक्रमे २ हजार ५५५ रुपये, १ हजार ५५५ रुपये व ९९९ रुपये रोख रक्कम तर घरगुती गणेशोत्सव स्पर्धेत सहभागी मधून तीन विजेते निवडण्यात येतील. त्यांना अनुक्रमे २ हजार २२२ रुपये, १ हजार १११ रुपये व ७७७ रुपये, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र समारंभ पूर्वक देऊन गौरवण्यात येईल.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कोणतेही शुल्क नसून जास्तीत जास्त गणेश भक्तांनी सहभाग घ्यावा, , असे आवाहन खेड तालुका पत्रकार संघ अध्यक्ष राजु चव्हाण व लायन्स क्लब ऑफ खेड सिटी अध्यक्ष सुरेश चिकणे यांनी केले आहे.