माजी खासदार निलेश राणे यांचे मोठे वक्तव्य
रत्नागिरी । प्रतिनिधी :रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर येथील शिवसृष्टीतील मावळ्यांच्या पुतळ्यांची मोडतोड करून विटंबना करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
या प्रकरणी ट्विट करताना निलेश राणे म्हणाले कि, ”महाराष्ट्रामध्ये एक फार मोठा दंगली घडवण्याचा कट रचला गेला जात आहे… मालवण नंतर रत्नागिरीमध्ये काल रात्री मारुती मंदिर जवळ मावळ्यांच्या पुतळ्यांची विटंबना करण्यात आली. या घटना फार विचार करून आणि नियोजनबद्ध पद्धतीने केलेल्या आहेत. हिंदू समाजाने आता मागे हटायचं नाही, यांचा बंदोबस्त आता करावाच लागेल. ”
रत्नागिरीतील घटनेनंतर शिवप्रेमी मारुती मंदिर येथे एकत्रित जमले होते त्यानंतर पोलीस आणि नगर परिषद प्रशासनाला त्यांनी ता प्रकरणाचा जाब विचारला आहे.












