खेड(प्रतिनिधी) कोकण मार्गावरून धावणाऱ्या लोकमान्य टिळक टर्मिनस-कुडाळ नियमित गणपती स्पेशलला आरवली स्थानकात थांबा देण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे.
त्यानुसार ०११६७/०११६८क्रमांकाच्या एलटीटी-कुडाळ स्पेशलला तात्पुरत्या स्वरूपात थांबा देण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या पाठोपाठच ०११६५/०११६६ क्रमांकाच्या एलटीटी-कुडाळ साप्ताहिक स्पेशलला नांदगाव रेल्वेस्थानकात अतिरिक्त थांबा देण्यात आला आहे. यामुळे प्रवाशी वर्गाची मोठी गैरसोय दूर झाली आहे










