खेड (प्रतिनिधी) खेड तालुक्यातील कर्टेल गावातील महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्षपदी गावातील युवा कार्यकर्ते श्री अक्षय चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. नुकत्याच पार पडलेल्या ग्रामसभेमध्ये त्यांची ही निवड जाहीर करण्यात आली
श्री अक्षय चव्हाण हे एक रिक्षा व्यवसायिक आहेत. गावातील सर्वच सामाजिक कार्यामध्ये युवा कार्यकर्ता म्हणून ते सुपरिचित आहेत. गेल्या काही वर्षात गावातील सर्वच सामाजिक कार्यामध्ये त्यांचा विशेष सहभाग आहे. कर्टेल गावातील युवकांसोबत ते अगत्यपूर्वक काम करीत आहेत. खेड तालुक्यातील काही सामाजिक संघटनांमध्ये ते सक्रिय आहेत. त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण कामाची दखल घेऊन गावातील सर्वच ग्रामस्थांनी त्यांची महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी निवड केली आहे. सरपंच श्री चव्हाण, मा.तंटामुक्त समितीचे अध्यक्ष व कर्टेल गावातील प्रमुख सामाजिक कार्यकर्ते श्रीकांतजी चव्हाण, श्री मनोहरजी चव्हाण, ग्रामसेवक, पोलीस पाटील, एडवोकेट श्री दिलीपजी चव्हाण, शिवसेने जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, आमदार मधू चव्हाण यानी अक्षय चव्हाण यांचे अभिनंदन केले











