राजापूर (वार्ताहर): खो खो ह्या खेळामध्ये महाराष्ट्र राज्य संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शहरानजिकच्या उन्हाळे गावचा सुपुत्र निखिल तुकाराम सोडये याचा राजापूर प्रतिष्ठान राजापूर यांचे सत्कार करण्यात आला.
श्री महाकाली मंदिर उन्हाळ येथे झालेल्या कार्यक्रमप्रसंगी वेळी राजापूर प्रतिष्ठान राजापूरचे अध्यक्ष मोहन पडावे, उपाध्यक्ष नंदकुमार पुजारे, कार्याध्यक्ष प्रकाश कातकर सहखजीनदार व रत्नागिरी जिल्हा पोलीस पाटील अध्यक्ष प्रकाश पुजारे, प्रतिष्ठान चे सदस्य सुधीर विचारे तसेच उन्हाळे गावचे नवनिर्वाचित तंटामुक्त समितीचे अध्यक्ष विजय मोंडे, गावचे माजी सरपंच गणपत सोडये, योगेश पुजारे, प्रकाश सोडये, सोडयेवाडी चे गावकर गणपत सोडये, पुजारेवाडी चे गावकर राजाराम पुजारे, उन्हाळे महालक्ष्मी मंदिराचे पुजारी महेश गुरव उन्हाळे मुंबई मंडळाचे सचिव बाळकृष्ण पुजारे, पांडुरंग सोडये उपस्थित होते.
यावेळी खो खो ह्या खेळामध्ये महाराष्ट्र राज्य संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या निखिल तुकाराम सोडये याचे कौतुक करण्यात आले. प्रतिष्ठान चे अध्यक्ष मोहन पाडावे यांनी खेळाचे महत्व पटवून दिले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिष्ठान चे सचिव राजू कार्शिंकर यांनी केले.












