
उल्का विश्वासराव यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार
राजापूर (वार्ताहर): तालुक्यातील चुनाकोळवण गावचे श्रध्दास्थान असलेल्या पुरातन श्री महाकाली देवस्थान गुरववाडीच्या विकासासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून तीन कोटी रूपयांचा भरघोस निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल भाजपाच्या राजापूर विधानसभा क्षेत्रप्रमुख सौ. उल्का विश्वासराव यांचा देवस्थान ट्रस्ट व चुनाकोळवण ग्रामस्थांच्या वतीने कृतज्ञता सत्कार करण्यात आला.
श्री महाकाली देवस्थान चुनाकोळवण गुरववाडी, आंबिकेश्वर प्रतिष्ठान व चूनाकोळवण ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच महाकाली मंदिर चूनाकोळवण येथे हा सत्कार सोहळा पार पाडला. यांच्या हस्ते सौ. उल्का विश्वासराव यांचा हृदय सत्कार करण्यात आला.
सौ. उल्का विश्वासराव यांनी राज्य शासनाच्या माध्यमातून चुनाकोळवण येथील पुरातन श्री महाकाली मंदिर गुरववाडीच्या विकासासाठी पर्यटन विकास अंतर्गत ३ कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. त्याचबरोबर गावातील संजय पाटणकर दुकान ते पर्यटन स्थळ सवतकडा रस्ता डांबरीकरणासाठी २० लाख रूपये व निवखोलवाडी सनगरे जोंधले जवाठ येथे बोअरवेल व नळ कनेक्शनसाठी ५ लाख रूपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून मंदिर विकासाबरोबरच गावच्या भौतिक विकासाला चालना मिळणार आहे.
याप्रसंगी अमेय विश्वासराव, करकचे श्री. गांधी, आंबिकेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष वसंत मटकर, उपाध्यक्ष उदय सावंत, पूरातन श्री महाकाली मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अनिल गुरव, देवस्थानचे विश्वस्त मंडळ व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थीत होते. यावेळी सौ. उल्का विश्वासराव यांना जाहीर पाठींबा देताना त्यांच्या पाठीशी एकजुटीने उभे राहण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला.











