सततच्या आजाराला कंटाळून महिलेची आत्महत्या

dead

 

 

पुनस वरचीवाडी येथील घटना

लांजा (प्रतिनिधी) सततच्या आजाराला कंटाळून ७० वर्षीय महिलेने घराच्या पडवीत साडीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना पुनस वरचीवाडी येथे घडली आहे .

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुनस वरचीवाडी येथे राहणारी ताई गोपाळ चापडे (वय ७० वर्षे) ही गेल्या काही वर्षांपासुन आजाराने त्रस्त होती. सततच्या आजाराने त्रस्त झाल्याने गुरुवारी रात्री राहत्या घराच्या पडवीमध्ये वाघाला साडीने गळफास लावून आत्महत्या केली. सकाळी ही घटना लोकांच्या लक्षात आल्यानंतर पोलिसांना याबाबची माहिती देण्यात आली. याप्रकरणी लांजा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल नासिर लावळेकर करत आहेत.