सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी तालुक्यातील मळगांव ब्राम्हणपाट येथील अंगणवाडी सेविका माया प्रविण सातार्डेकर ( ४५, रा. मळगांव रेडकरवाडी ) यांचे शनिवारी रात्री १०.४५ च्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, दीर, भावजयी, पुतणे, पुतण्या , आई , भाऊ , बहिण असा परिवार आहे. त्यांच्या पार्थीवावर आज रविवारी दुपारी ३ च्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली. सदैव हसतमुख व सर्वांशी मनमिळाऊ स्वभावाच्या माया यांच्या निधनामुळे मळगांव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.








