रत्नागिरी : सारस्वत हितवर्धक मंडळ, मुंबई या संस्थेचे शतकमहोत्सवी सुरू असून वर्षभर विविध कार्यक्रम व उपक्रम वेगवेगळ्या ठिकाणी सुरू आहेत. या वर्षात मुंबई, डोंबिवली, रोहा येथे सारस्वत स्नेहसंमेलने मोठ्या उत्साहात संपन्न झाली. धारतळे, राजापूर येथे मोफत चष्मे वाटप व वैद्यकीय शिबीर, मुंबईत महिला मेळावा इत्यादी कार्यक्रम/उपक्रम संपन्न झाले. तसेच आता रत्नागिरी जिल्हा सारस्वत स्नेहसंमेलन रविवार दि. २९ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ०९ ते सायं. ०५ या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. हे संमेलन सारस्वत स्नेहवर्धक मंडळ, रत्नागिरी आणि सारस्वत स्नेहवर्धक मंडळ, लांजा यांच्या सहकार्याने मराठा भवन हॉल, माळ नाका, जिल्हा परिषद कार्यालयामागे, रत्नागिरी या ठिकाणी संपन्न
होणार आहे.
हे संमेलन सारस्वत हितवर्धक मंडळाचे अध्यक्ष सीए श्री. सिद्धार्थ सिनकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. मकरंद साखळकर (प्राचार्य, गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी) हे प्रमुख पाहुणे व सीए श्री. सुनील सौदागर (ज्येष्ठ संचालक, सारस्वत बँक) हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. सकाळच्या सत्रात ‘भक्तिरंग’ हा भजनाचा कार्यक्रम श्री. नंदकुमार केळकर आणि सहकारी (गजानन प्रासादिक भजनी मंडळ, भालावली) सादर करणार आहेत. तसेच विविध क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल समाज बांधवांचा सत्कार करण्यात येणार आहे. त्यात डॉ. अनिल त्र्यंबक पत्की (वैद्यकीय क्षेत्र), डॉ. प्रमोद रंगनाथ तेंडुलकर (वैद्यकीय), डॉ. शिरीष शेणई (वैद्यकीय), सौ. जिज्ञा पाटील-पूर्वाश्रमीची वागळे (शासकीय सेवा, कक्ष अधिकारी, मंत्रालय), श्री. सतीश कामत (पत्रकारिता-सामाजिक), श्री. संजीव कबीर (शैक्षणिक- पत्रकारिता), डॉ. किशोर सुखटणकर (शैक्षणिक), अॅड. विजय साखळकर (विधी), श्री. अजित बळवंत वागळे (उद्योग- व्यवसाय), श्री. अजय रवींद्रनाथ तेंडुलकर, (उद्योग-व्यवसाय), श्री. सुभाष जगन्नाथ पोतकर (उद्योग- व्यवसाय), श्री. दिलीप मराठे (सामाजिक), श्री. नंदकुमार परशुराम केळकर (कला), श्री. दिलीप कामत (शिल्पकला), नितीन कानविंदे (सांस्कृतिक/सामाजिक), वालावलकर हॉस्पिटल, डेरवण (वैद्यकीय/सामाजिक), कु. पूर्वा किनरे आणि कु. प्राप्ती किनरे (क्रीडा), कु. स्वरा साखळकर (क्रीडा) या मान्यवरांचा समावेश आहे.
यावेळी सादर होणाऱ्या ‘कृषिरंग’ या कार्यक्रमात ‘फळ प्रक्रिया उद्योग, विपणन आणि भविष्य अनुभव कथन व मार्गदर्शन या विषयावर प्रसिद्ध बागायतदार, प्रक्रिया उद्योग प्रवर्तक श्री. अमर देसाई यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान होणार आहे. दुपारच्या सत्रात अभंग, नाट्य- संगीत, भावगीतांचा समावेश असलेला ‘भावरंग’ हा सुरेल कार्यक्रम प्रसिद्ध गायिका सौ. मुग्धा भट-सामंत व त्यांचा वाद्यवृंद सादर
करणार आहेत. तरी या कार्यक्रमास सर्व ज्ञातिजनांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन सारस्वत हितवर्धक मंडळ, मुंबई, सारस्वत स्नेहवर्धक मंडळ, रत्नागिरी व सारस्वत स्नेहवर्धक मंडळ, लांजा यांच्यावतीने करण्यात आलेले आहे. अधिक माहितीसाठी श्री. अशोक सिनकर, मुंबई (9594474353); श्री. उत्पल वाकडे,
रत्नागिरी (7767809192); श्री. मनोज तेंडुलकर, लांजा (9405728900)यांच्याशी संपर्क साधावा.










