बांदा (प्रतिनिधी) : इन्सुली येथील श्री देवी माऊली मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त ३ ते ११ ऑक्टोबर दरम्यान विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार ४ ते १० ऑक्टोबर दरम्यान सकाळी देवीची ओटी भरणे, सर्व देवतांना हार अर्पण, प्रसाद, दुपारी नेवैद्य व महाप्रसाद तर सायंकाळी ७ वाजता देवीची आरती व प्रसाद होईल.
यानिमित्ताने गुरुवार ३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८.३० वाजता नवे करणे, १० वा. घटस्थापना, दुपारी नैवेद्य, सायंकाळी ७ वा. देवीची आरती व प्रसाद, ७.३९ वा. स्थानिकांचे भजन, ९.३० वाजता श्रीदेवी माऊली दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. शुक्रवार ४ रोजी ७.३० वा. डोबाशेळ मंडळाचे भजन, ८.३० वा. भजनीबुवा वैभव राणे यांचे भजन, ९.३० वा. श्रीदेवी माऊली भजन मंडळ परबवाडी यांचे भजन तर १०.३० वा. परबवाडी महिला मंडळ यांचा फुगडीचा कार्यक्रम होईल.
शनिवार ५ रोजी ७.३० वा. क्षेत्रफळवाडी येथील स्थानिकांचे भजन, ९ वा. क्षेत्रफळ, गावडेवाडी, गावकरवाडी व परबवाडी येथील महिलांचा फुगडीचा कार्यक्रम होईल. रविवार ६ रोजी ७.३० वा. कोठावळेबांध व मूळपुरुष भजन मंडळ गावडेवाडी यांची भजने होतील. ९ वाजता चपई नृत्य होईल. सोमवार ७ रोजी ७.३० वा. स्थानिकांची भजने होतील. मंगळवार ८ रोजी सायंकाळी ६ वा. कुडवटेंब मंडळाचे भजन, ७.३० वा. कुडवटेंब महिलांची फुगडी, रात्री ९.३० वा. नाईक मोचेमाडकर दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग होईल.
बुधवार ९ रोजी सायंकाळी ६ वाजता मुळीकवाडी भजन मंडळाचे भजन, ७.३० वा. पागावाडी महिलांची फुगडी, ८.३० वा. पागावाडी, सावंतवाडा येथील भजने, ९.३० वा. परबवाडी महिलांचा दांडिया कार्यक्रम होईल. गुरुवार १० रोजी सायंकाळी ७.३० वा. बिलेवाडी येथील भजन, रात्री ८.३० वा. बिलेवाडी येथील महिलांची फुगडी होईल. शुक्रवार ११ रोजी घट उठवणे, तीर्थप्रसाद आदी कार्यक्रम होतील. शनिवार १२ रोजी शिवलग्न सोहळा होऊन नवरात्रोत्सव उत्सवाची सांगता होईल. भाविकांनी श्री दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रीदेवी माऊली देवस्थान समिती मानकरी व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.











