भांबेड येथे ५ ऑक्टोबर रोजी राज्यस्तरीय चिखल नांगरणी स्पर्धेचे आयोजन

मनविसे लांजा तालुका संपर्क अध्यक्ष किरण रेवाळे यांचे सौजन्य

लांजा (प्रतिनिधी) तालुक्यातील भांबेड येथे शनिवारी ५ ऑक्टोबर रोजी राज्यस्तरीय चिखल नांगरणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे .
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे लांजा तालुका संपर्क अध्यक्ष किरण रेवाळे यांच्या सौजन्याने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धा भांबेड येथील दत्त मंदिर पवारवाडी येथे सकाळी ११ वाजता सुरू होणार आहे. स्पर्धा गावठी आणि घाटी अशा दोन गटात घेण्यात येणार आहे .स्पर्धेतील दोन्ही गटातील विजेत्यांना एकसारखीच बक्षिसे दिली जाणार आहेत. त्यामध्ये प्रथम विजेत्या स्पर्धकाला फ्रिज आणि आकर्षक ढाल, द्वितीय विजेत्याला ३२ इंची एलईडी टीव्ही आणि ढाल, तृतीय विजेत्याला पिठाची घरघंटी व ढाल, चौथ्या विजेत्याला २४ इंची एलईडी टीव्ही व ढाल, पाचव्या विजेत्याला कुलर व ढाल, सहाव्या विजेत्याला होम थिएटर व ढाल, सातव्या विजेत्याला कुलर व ढाल त्याचप्रमाणे गाव पातळीवरील एक मानाची दोन फुटी गदा अशी भरघोस बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे .

 

या स्पर्धेसाठी १००० रुपये प्रवेश फी ठेवण्यात आली आहे. स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी किरण रेवाळे – ८३७८८१३०८३,पिंट्या मटकर-७६२०५५३२८६, सिद्धेश धडम- ८०१०८८४७८५ यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन आयोजक किरण रेवाळे यांनी केले आहे.