भाजपा च्या वतीने वेंगुर्ले जेष्ठ नागरिक संघाचे संस्थापक अध्यक्ष आर.पी.जोशी सर यांचा सत्कार..
वेंगुर्ले : प्रतिनिधी l ६५ वर्ष किंवा त्यावरील वयोगटातील जेष्ठ नागरिकांना वयोमानापरत्वे येणारे अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने – उपकरणे खरेदी करण्यासाठी, तसेच मनस्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्र याद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी शासनाने राज्यात “मुख्यमंत्री वयोश्री योजना” राबवीण्यास सुरुवात केली आहे. या योजनेद्वारे नागरीकांना ३००० रु. शासनाकडून दिले जाणार आहेत त्याचा जेष्ठ नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन भाजप चे जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांनी केले आहे.
जेष्ठ नागरिक दिना चे औचित्य साधून साई मंगल कार्यालय येथे भाजप तर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मार्गदर्शन करताना प्रसन्ना देसाई बोलत होते. कार्यक्रमात शासनाकडून जेष्ठांसाठी देण्यात आलेल्या मुख्यमंत्री वयोश्री योजना व मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची सविस्तर माहिती देऊन या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले.
भाजपा च्या वतीने यावेळी वेंगुर्ले जेष्ठ नागरिक संघाचे संस्थापक अध्यक्ष आर.पी.जोशी सर यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी जेष्ठ नागरिकांसाठी महाराष्ट्र शासनाकडून देण्यात येत असलेल्या योजनांचे मोफत फाॅर्म वाटप करण्यात आले. यावेळी भाजप ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर व प्रशांत खानोलकर, जेष्ठ कामगार नेते प्रकाश रेगे , अध्यक्ष शामराव काळे सर , उपाध्यक्ष रमेश पिंगुळकर , सचिव मोहन दाभोलकर , सहसचिव रामचंद्र घोगळे , सदस्य गुरुनाथ बांदवलकर , संभाजी येरागी , विद्याधर कडुलकर , शांताराम आईर , जगदीश तिरपुडे, सगुण माळकर तसेच अनेक जेष्ठ नागरिक उपस्थित होते.












