
ज्येष्ठ नागरिकांपासून ते पासून लहान मुलांपर्यंत सगळेच आनंदाने सहभागी
दापोली (प्रतिनिधी )लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांनाच नवरात्रोत्सवाचा आनंद द्विगुणित करता यावा यासाठी विविध खेळ खेळत हा नवरात्रोत्सव साजरा व्हावा या उद्देशाने जालगाव गावातल्या समर्थ नगर येथील महिला,लहान मुलं,पुरुष मंडळी दांडिया नृत्य ,विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम,प्रश्नमंजुषा यासारखे मनोरंजनाचे खेळ खेळत हा नवरात्रउत्सव साजरा करत आहेत. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सगळ्यांना एकत्र आणण्याचे कौशल्य येथील महिला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी साधल आहे. या नगराचे अध्यक्ष सुदर्शन खानविलकर,महेश शिंदे श्री. निखार्गे आदी ज्येष्ठ मंडळींनी या कार्यक्रमाला सहकार्य केले. या निमित्ताने आपल्यातील अंगभूत नृत्यकौशल्यलाही वाव देत लहान मुलांसाठी विविध कार्यक्रम नऊ दिवस आयोजित केले जातात यामध्ये जेष्ठान पासून लहानांपर्यंत सगळेच आनंदाने सहभागी होत आहेत. यानिमित्ताने समर्थ नगर मधील या एकोप्याच दर्शन घडत आहे. प्रश्नमंजुषा, संगीत खुर्ची लहान मुलांसाठी विविध खेळ व यातून साधलेले सामाजिक ऐक्य समर्थ नगरातील विविध सदस्यांकडून दिली जाणारी बक्षीस हा उपक्रम कौतुकास्पद ठरला आहे.
समर्थ महिला मंडळाच्या वतीने हे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येतात. समर्थ नगर महिला मंडळाच्या अध्यक्ष दीप्ती निखार्गे,निधी आयरे, खजिनदार जानवी राऊत उपाध्यक्ष सुहासिनी खानविलकर व पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार लता सांगडे ,मधुरा फटकरे समिता वाईकर, संध्या गायकवाड ,आशा माने या महिला कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली दरवर्षी हे सांस्कृतिक कार्यक्रम समर्थ महिला मंडळाच्या वतीने हे कार्यक्रम घेण्यात येतात. सगळ्यांना एकत्र आणायच कौशल्य यासाठी महिला मंडळाच्या पदाधिकारीही मेहनत घेतात अशी माहिती समर्थ नगराचे पदाधिकारी महेश शिंदे यांनी दिली.











