एकजण बालंबाल बचावला, खाडीत सुरू होता वाळू उपसा
खेड(प्रतिनिधी)
तालुक्यातील खाडीपट्ट्यातील बहिरवली खाडीत बुधवारी रात्री वाळू उपसा करणारी बोट उलटल्याची घटना उघडकीस आली. यावेळी एकजण खाडीत बुडत असताना स्थानिकांच्या मदतीने त्यास वाचवण्यास यश आले. बेकायदेशीरपणे वाळू उपसा सुरू असताना घटना घडली असल्याची माहिती पुढे आली आहे.
राजाराम भिकू जाधव (रा. तुंबाड – भोईवाडी) असे बालंबाल बचावलेल्या कामगाराचे नाव आहे. बहिरवली खाडीत सक्शन पंपाच्या सहाय्याने अनधिकृतपणे वाळू उपसा सुरू आहे. बुधवारी रात्रीच्या वाळू उपसा सुरू असतानाच बोट उलटली. या बोटीत असलेला कामगार खाडीत पडला. ही बाब अन्य कामगारांच्या निदर्शनास आल्यानंतर त्याला तातडीने बाहेर काढण्यात आले











