समाजासाठी २४ तास ऑन ड्युटी असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबिर

कोकण संस्थेचा पोलीस हुतात्मा दिनाचे औचित्य साधून पुढाकार

सिंधुदुर्ग :
पोलीस हुतात्मा दिनाचे औचित्य साधून कोकण संस्थेच्या पुढाकाराने आज पोलीस मुख्यालय ओरोस येथे समाजासाठी २४ तास ऑन ड्युटी असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. कोकण कला व शिक्षण विकास संस्था या वर्षी पोलीस हुतात्मा दिनाचे औचित्य साधून पोलीस बांधव आणि भगिनींसाठी जिल्हा होमगार्ड कार्यालय सिंधुदुर्ग येथे २१ ऑक्टोबर रोजी आरोग्य शिबीर आयोजित केले होते.

कोणताही वाईट प्रसंग असो, उत्सव असो, नैसर्गिक आपत्ती असो कि आतंकवादी हल्ला, आपल्या जीवाची पर्वा न करता सर्वात पुढे कोण असेल तर ते पोलीस दल असून त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे खूप आवश्यक आहे. सज्जनांचे रक्षण करण्यास आणि दुर्जनांवर नियंत्रण ठेवून त्यांचा नायनाट करण्यास कटिबध्द असलेल्या पोलीस बंधू भगिनींची ८ तासांची ड्युटी कधी २४ तास होते हे त्यांनाही कळत नाही. नोकरी करणारे आणि समाजासाठी कर्तव्य बजावणारे यातील हा ठळक फरक दिसत असला तरीही पोलीस बांधवानी या धकाधकीच्या जीवनात स्वतःच्या आरोग्याची काळजी नीट घ्यावी याच उद्देशाने कोकण कला व शिक्षण विकास संस्था या वर्षी पोलीस हुतात्मा दिनाचे औचित्य साधून पोलीस बांधव आणि भगिनींसाठी जिल्हा होमगार्ड कार्यालय सिंधुदुर्ग येथे २१ ऑक्टोबर रोजी आरोग्य शिबीर आयोजित केले होते त्याला पोलीस कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

यावेळी उदघाटन प्रसंगी व्यासपीठावर मा.श्री.सौरभकुमार अग्रवाल (IPS) पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग, मा.श्री. कृषीकेश रावले – अप्पर पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग, मा.श्री. राजेंद्र पाटील -पोलीस निरीक्षक (स्थानिक गुन्हे शाखा ) मा.श्री. रामदास पालशेतकर -राखीव पोलीस निरीक्षक, मा श्री. सागर खंडागळे, मा.श्री.नितीनसिंह तोमर -राखीव पोलीस उपनिरीक्षक, निवृत्त पोलिस गवस साहेब श्री. प्रथमेश सावंत प्रकल्प व्यवस्थापक कोकण संस्था, पोलीस विभागाचे डॉ. अमोल अन्नमवार. जनरल फिजिशियन डॉ.सान्वी म्हाडदळकर व डॉ. प्रणव प्रभू सर, फिजिओथेरपिस्ट डॉ.चैताली प्रभू, नेत्रतज्ञ डॉ. सौरभ बालम, डॉ. विवेक घायल, डॉ.केशव करांडे, डॉ. ओमकार मुंजाळ, डॉ.शिवशंकर मुंडे, डॉ.वीणा गोविंदवार, लॅब इन्चार्ज श्री. प्रशांत जाधव व सहकारी. श्री.सुनील कुंडगीर समाजसेवा अधीक्षक. इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

प्रकल्प व्यवस्थापक श्री. प्रथमेश सावंत यांनी प्रस्ताविक करताना संस्थेच्या विविध समजपयोगी उपक्रमांचा माहिती दिली.
त्यानंतर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मा.श्री. सौरभकुमार अग्रवाल साहेब उपस्थितांना मार्गदर्शन करताना कोकण संस्थेने आयोजित केलेल्या या विशेष उपक्रमाबद्दल आभार मानले. तसेच संस्थेच्या विविध सामाजिक, आरोग्य व शैक्षणिक उपक्रमाबद्दल कौतुक केले. व सर्वांना निरोगी आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाच्या निमित्ताने अप्पर पोलीस अधीक्षक मा. श्री. कृषीकेश रावले यांनी आपल्या मनोगतात या आरोग्य शिबिराचे महत्त्व व उपयोग बद्दल मार्गदर्शन केले. पुढील काळात कोकण संस्थेसोबत अनेक उपक्रम सिंधुदुर्ग पोलीस व संस्था यांच्या सहकार्यातून जिल्ह्यामध्ये आयोजित करावेत अशी ग्वाही दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. खंडागळे यांनी आपल्या मनोगतात प्रदूषण, अन्नभेसळ तसेच अवेळी जेवण किंवा बाहेरचे अन्न खाणे यामुळे पोलीस बांधवांना आरोग्य विषयक समस्या वाढत आहेत. जनतेला चांगली सेवा देण्यासाठी आपण 100% फिट असणे आवश्यक असते त्यामुळे या आरोग्य शिबिराचा जास्तीतजास्त लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी आपल्या पोलीस सहकारी व कर्मचारी यांना केले.

त्यानंतर निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल अन्नमवार सर यांनी उच्च रक्तदाब बाबत तसेच रक्तदाब विषयी समज गैरसमज बाबत सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे समन्वयक श्री. समीर शिर्के यांनी केले. या प्रसंगी जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग, जिल्हा शासकीय महाविद्यालय, महालॅब, होमगार्ड कार्यालय सिंधुदुर्ग यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला कोकण संस्थेचे शशिकांत कासले, हनुमंत गवस, अमित पाटील, समीर शिर्के, सत्यवान भगत, भगवान चव्हाण, श्रुती तारी, स्वाती मांजरेकर, प्रवीण पेडणेकर, प्रदीप पवार,अमोल गुराम आदी उपस्थित होते.