लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे आयोजन .
स्वप्नील | कुडाळ : सरदार वल्लभ भाई पटेल यांचे जयंती निमित्त संपूर्ण भारत देशामध्ये दिनांक 28 ऑक्ट ते 3 नोव्हेंबर या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, सिंधुदुर्ग यांच्यावतीने दक्षता जनजागृती सप्ताहाचे तालुका निहाय आयोजन करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक महेश तरडे त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवला जात आहे. सत्यनिष्ठा की संस्कृती से राष्ट्र की समृद्धी पोलीस उपाधीक्षक अरुण पवार, समाजाला प्रबोधन करून भ्रष्टाचार मुक्त भारत करण्यासाठी आवाहन करणार आहेत. तालुका निहाय्य सार्वजनिक ठिकाणी शाळा महाविद्यालय तसेच ज्येष्ठ नागरिक यांच्याकरिता विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
कोणत्याही शासकीय अधिकारी कर्मचारी अथवा त्यांचे करिता कोणी खाजगी इसम शासकीय कामासाठी शासकीय व्यतिरिक्त पैशाची मागणी करत असल्यास 9821919915 तसेच टोल फ्री 1064 क्रमांक वरती संपर्क साधावा असे आवाहन पोलीस उपअधीक्षक अरुण पवार यांनी प्रेस नोट द्वारे केले आहे.











