“लाडकी बहिणीचे पैसे 2100 रुपये करणार ” ; अजित पवारांचे लाडक्या बहिणींना मोठे आश्वासन; राष्ट्रवादीचा जाहीरनामा प्रसिद्ध

Ajit Pawar Manifesto । राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात पक्ष आपले जाहीरनामे प्रसिध्द करत आहेत, त्यातच आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचा आज जाहीरनामा प्रसिध्द करण्यात येत आहे.

यामध्ये सर्वात महत्वाची घोषणा लाडकी बहीण योजनेविषयी करण्यात आली आहे.

लाडक्या बहिणींसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. आता लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत मिळणाऱ्या रकमेत वाढ करण्यात येईल असे म्हटले गेले आहे. लाडकी बहीण योजनेचे पैसे 1500 वरून 2100 रुपये करणार असल्याचे अजित पवारांच्या राष्ट्रवाडीच्या जाहीरनाम्यामध्ये म्हटले गेले आहे.

मागच्या 4 महिन्यातील बदल जनतेसमोर सादर Ajit Pawar Manifesto ।

जाहीरनामा प्रसिध्द करताना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले, महायुती सरकार काळात जे काम केलं ते लोकांपर्यंत घेऊन चाललो आहोत. आम्ही काही बदल करणाऱ्या योजना मागच्या 4 महिन्यात केल्या आहेत. ‘लाडकी बहीण योजना, आर्थिक दुर्बल घटकातील मुलींना शिक्षणासाठी पैसे अशा अनेक योजना जाहीर केल्या. याला प्रचंड प्रतिसाद देखील मिळत आहे. तालुका स्तरीय देखील जाहीरनामा प्रसिद्ध करत आहोत.

स्थानिक पातळीवरील जाहीरनामा यामध्ये आमदारांच काम मांडलेले असेल. आम्ही सुरू केलेल्या हेल्पलाइनला 25 लाख कॉल आले आहेत. आता आम्ही टोल फ्री नंबर सुरू करत आहोत. 9861717171 हा टोल फ्री नंबर सुरू केला आहे. यावर तालुका स्तरीय जाहीरनामा ऐकता येणार आहे. लाडकी बहीण योजेनच्या पैशात वाढ करत आहोत. ती आम्ही 2100 रुपये करणार आहोत. 2 कोटी 30 लाख महिलांना याचा लाभ मिळणार आहे.

अजित पवारांच्या जाहीरनाम्यातील महत्वाचे मुद्दे Ajit Pawar Manifesto ।
* लाडकी बहिण योजने संदर्भात बहिणींना दीड हजर नाही तर तबल 2100 रुपये देण्यात येणार

* सोबत महिला सुरक्षेसाठी 25 हजार महिलांना पोलिस दलात समावेश करण्याचा वादा करण्यात आला आहे

* यात धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजर रुपये देण्याचा वादा करण्यात आला आहे

तर ग्रामीण भागात 45000 पाणंद रस्त्यांच्या निर्मितीचा वादा

शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा आणि शेतीपिकांच्या msp वर 20%अनुदान देण्याचा वादा करण्यात आला आहे

* वीज बिलात 30% कपात करून सौर व अक्षय ऊर्जेला प्राधान्य देण्याचा वादा करण्यात आला आहे

* वृद्ध पेन्शन धारकांना आता पंधराशे वरुण महिन्याला 2100 रुपये देण्याचा वादा करण्यात आला आहे

* दहा लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षणातून महिन्याला दहा हजार रुपये विद्यावेतनाचा वादा

* 25 लाख रोजगार निर्मितीचा वादा