राजापूर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार किरण सामंत यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन संपन्न 

 

 

लांजा( प्रतिनिधी) लांजा राजापूर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना भाजपा आरपीआय व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)महायुतीचे उमेदवार किरण सामंत यांच्या लांजा शहरातील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आज शनिवारी ९ नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजता पार पडले .

लांजा बस स्थानकासमोरील हॉटेल कीर्ती महलच्या शेजारी किरण सामंत यांच्या शिवसेना महायुतीचे प्रचार कार्यालय सुरू करण्यात आले आहे त्याचे उद्घाटन आज शनिवारी शिवसेना शिंदे गटाचे राजापूर लांजा विधानसभा क्षेत्र प्रमुख सुनील कुरूप व लांजा गावचे मानकरी नाना शेट्ये यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आणि लांजा तालुका व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रसन्न शेट्ये यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले .

या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी शिवसेना शिंदे गटाचे तालुकाप्रमुख गुरुप्रसाद देसाई, विधानसभा क्षेत्र प्रमुख राजू कुरूप,उपशहर प्रमुख तथा नगरसेवक सचिन डोंगरकर, लांजा नगराध्यक्ष मनोहर बाईत ,पदाधिकारी श्याम खानविलकर, महेश बामणे, नगरसेविका दुर्वा भाई शेट्ये , प्रसाद भाई शेट्ये ,तालुका पदाधिकारी वसंत घडशी, सर्व नगरसेवक आणि शहर पदाधिकारी, भाजपाचे लांजा तालुका अध्यक्ष चंद्रकांत मांडवकर , नगरसेवक संजय यादव, तालुका सरचिटणीस विराज हरमले , शैलेश खामकर व अन्य प्रमुख पदाधिकारी, आरपीआयचे तालुकाध्यक्ष विलास कदम, लांजा नगरपंचायतीचे शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक यांच्यासह भाजपा आरपीआय आणि राष्ट्रवादी अजित पवार गट महायुतीचे सर्व पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते ‌.

या प्रचाराच्या उद्घाटन प्रसंगी जोरदार फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. त्याचप्रमाणे ढोल ताशांचे गजरात यावेळी परिसर दणाणून सोडला. यावेळी शिवसेना जिंदाबाद घ्या घोषणा देण्यात आल्या.