हिवाळे येथे उबाठाला पुन्हा धक्का : अनेक कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

 

खा. नारायण राणे यांनी प्रवेशकर्ते यांचे भाजपात केले स्वागत

मालवण | प्रतिनिधी : हिवाळे गावात भाजपाने उबाठा गटाला पुन्हा एकदा धक्का दिला आहे. अनेक उबाठा कार्यकर्ते यांनी खा. नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थित भाजपात प्रवेश केला आहे. सर्वांचे खा. राणे यांनी भाजपात स्वागत केले.

गेल्या काही दिवसांपासून उबाठाचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत महायुतीत सहभागी होत आहे. वैभव नाईक यांच्या अपयशी कार्यपद्धतीला जनते सोबत त्यांचे कार्यकर्तेही कंटाळले आहेत. हे स्पष्ट होत आहे.

प्रवेशकर्ते मोहन परब गणेश राणे सुभाष पटब विश्वनाथ परब प्रभाकर परब रामा मेस्त्री गणेश पवार यांसह अनेक कार्यकर्ते यांनी प्रवेश केला. यावेळी जिल्हा बँक संचालक बाबा परब, जिप माजी बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण, माजी उपसभापती राजू परूळेकर, सरपंच रघुनाथ धुरी, बुथ अध्यक्ष विश्वनाथ परब, माजी सरपंच विश्वास परब, भाई घाडीगावकर, नयन कुलकर्णी, मच्छिंद्र परब, राजू परब, कृष्णा परब, प्रकाश परब यांसह अन्य भाजपा पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.