महायुतीचे उमेदवार माजी खासदार निलेश राणे, आ. नितेश राणे यांच्या विजयाचे साकडे
आज उमेदवारी अर्ज दाखल करणार
अमित खोत | मालवण : विधानसभा निवडणूक 2024 कुडाळ मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार निलेश राणे तर कणकवली मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार आ. नितेश राणे हे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या पार्श्वभूमीवर मालवणचे ग्रामदैवत श्री देव नारायण रामेश्वर देवस्थान येथे राणे कुटुंबानी दर्शन घेत आशीर्वाद घेतले. यावेळी खासदार नारायण राणे, सौ. निलम राणे, सौ. प्रियंका राणे, कु. अभिराज राणे यांसह महायुती पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, निलेश राणे, नितेश राणे मोठ्या मताधिक्याने विजयी होऊ दे असे साकडे यावेळी घालण्यात आले.
यावेळी उपस्थिती कार्यकर्त्यांनी खासदार नारायण राणे यांचे जंगी स्वागत केले. यावेळी महायुतीचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.












