रत्नागिरी | प्रतिनिधी : शहरातील जुना माळनाका येथील अपार्टमेंटमध्ये नेपाळी तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली.ही घटना गुरुवार 4 मे रोजी पहाटे 4 वा.सुमारास उघडकिस आली असून शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हश्री भक्ता थडेरा (32,मुळ रा.पंचपुरी,नेपाळ सध्या रा.शंखेश्वर पार्क डी विंग जुना माळनाका,रत्नागिरी) असे गळफास घेत आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.गुरुवारी सकाळी 4 वा.सुमारास हरी थडेराच्या नातेवाईकांना तो शंखेश्वर पार्क मध्ये ओढणीने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला.त्याने दारुच्या नशेत आपल्या डाव्या हाताच्या मनगटावर काचेने जखमाही करुन घेतलेल्या होत्या.नातेवाईकांनी त्याच्या गळ्यातील ओढणी कापून त्याला जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले.तेथील वैद्यकिय अधिकार्यांनी हरीला तपासून मृत घोषित केले.याप्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.












