भरणे पतसंस्थेत ४.२२ कोटींचा घोटाळा – अध्यक्ष, उपाध्यक्षांसह ५ जणांना अटक

खेड | राकेश कोळी 

खेड तालुक्यातील भरणे येथील शामराव नागरी सहकारी पतसंस्थेत तब्बल ४ कोटी २२ लाख ८१ हजार रुपयांचा आर्थिक घोटाळा उघडकीस आला आहे. या प्रकरणी अध्यक्ष दत्ताराम बाळा बैंकर, उपाध्यक्ष सुधाकर शिंदे, माजी उपाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी सीईओ प्रिया सुतार व सुभाष शिंदे या ५ जणांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली.

शनिवारी न्यायालयाने त्यांना ३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

लेखापरीक्षणात संस्थेला ३.७९ कोटींचा तोटा व बनावट एफ.डी.आर.द्वारे ४३ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी आरोपींवर भादंवि कलम ४२०, ४०९, ४०६, १२० (ब), ३४, ४६७, ४६५ तसेच महाराष्ट्र ठेवीदार हितसंबंध संरक्षण अधिनियम ३ व ४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घोटाळ्यामुळे ठेवीदारांमध्ये संतापाची लाट असून पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सुरू आहे.