खेड (प्रतिनिधी)
महामार्गा वरील भरणे – काशीमठाच्या पाठीमागील शौचालयात एका २७ वर्षीय तरुणाने टॉवेलच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १८ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
मैफुल इस्लाम पिता तुराप शेख (२७, रा. बांशपाडा, गोधनपाडा, पंचायत राणीनगर, जि. मुर्शिदाबाद, राज्य – पश्चिम बंगाल ) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. कळंबणी उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी १८ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास त्यास मयत घोषित केले. अधिक तपास येथील पोलीस करीत आहेत.












