७७% मतदान युवकाची मेहनत
दोडामार्ग : सुहास देसाई
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकित मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मतदार जागृती करत कुडासे गावांत युवकांनी घेतलेली जबाबदारी नवीन मतदार यांना प्रेरणादायी ठरणार आहे. कुडासे गावठाण येथे तब्बल ७७ टक्के मतदान करत युवकांनी देशाची लोकशाही बळकट करण्याच्या कर्तव्यात मोठं योगदान दिल्याने त्याचं कौतुक होत आहे. अशा प्रकारे सर्व गावात उपक्रम राबविण्यात सुरुवात झाल्यास लोकशाही पद्धतीने नव नियुक्ती शासन येण्यास हातभार लागणार आहे
यामध्ये गावातील वयोवृद्ध ९५ वर्षाच्या मंगला देसाई या आजी बाईंनी सुद्धा थेट मतदान केंद्रावर जात मतदानाचा हक्क बजावला. यासाठी यांचा नातू व अन्य युवकांनी या आजी बाईंना त्यांचा मतदानाचा हक्क बजावण्यास मदत केली. गावातील एकही उपस्थित मतदानापासून वंचित राहणार नाही यांची विशेष काळजी तेथील युवकांनी घेतली. महायुतीच्या बूथवर असलेल्या प्रसाद कुडासकर, चेतन देसाई, हरी देसाई, राजन परब, राघोबा देसाई, संतोष देसाई, राजन देसाई, किशोर देसाई, प्रविण देसाई, लक्ष्मण देसाई व अन्य सहकारी यांनी विशेष मेहनत घेतली. मात्र गावातील वाढलेले मतदान हे या निवडणुकीच विशेष ठरले. यांची चर्चा तालुक्यात होताना दिसत आहे










