मसूरेत निलेश राणे यांच्या विजयाचा जल्लोष!

 

 

निलेश राणे तुम आगे बढो घोषणेने परिसर दुमदूमला

मसूरे | झुंजार पेडणेकर :कुडाळ मालवण मतदार संघातील उमेदवार निलेश राणे विजयी होताच मसूरे बाजारपेठ तसेच शिवसेना शाखा येथे फटाक्यांची आताषबाजी करण्यात आली. “निलेश राणे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है” अशा घोषणा देत परीसर दनाणून सोडला.

यावेळी माजी उपसभापती छोटू ठाकूर, सचिन पाटकर, पुरुषोतम शिंगरे,राजू सावंत, अजय प्रभूगावकर,पंढरीनाथ मसूरकर, जीवन मुणगेकर, यशवंत हिंदळेकर, मनिष बागवे, बंटी मुणगेकर, सुयोग राणे, हरी ठाकूर, किरण पाटील, संजय ठाकूर, श्री मसूरकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.